:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक २८\११\२०१७

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवारास मदत व आत्महत्य सारखा प्रकार पुन्हा घडू नये म्हणुन विशेष प्रबोधन कार्यक्रम आयोजित.

धुळे जिल्हातील शिरपुर तालुक्यातील त-हाडी या गावात मागील तीन वर्षापासून २२ शेतकरी बांधवानी कर्ज व पारिवारिक समस्येपोटी गळफास व विष प्राशन करुण आत्महत्या केल्या . असे वाईट प्रसंग पुन्हा घडू नये म्हणुन... 

त-हाडी या गावात लोहार गल्ली भवानी चौक

या ठिकाणी विशेष प्रबोधनपर कार्यक्रम

► श्री युवराज मुरार जाधव

यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमात खालील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते ... 

► सरपंच श्री कैलास भामरे

► प्रा. श्रीमती लुमसे मैडम

► प्रा.श्री कदम सर

► प्रा.श्री चव्हाण सर

► श्री महेंद्र खोंडे

► श्री दिलीप गिरासे

      या कार्यक्रमास बहुसंख्य ग्रामस्त बंधु भगिनी उपस्थित होते . संकटाला घाबरून आत्महत्या करू नका व व्यसन मुक्ति यावर प्रबोधन करण्यात आले व ज्या २२ शेतकरी बांधवानी आत्महत्या केल्या त्यांच्या विधवा परिवारास श्री युवराज मुरार जाधव* यांच्या कडून साड्याचे वाटप करण्यात आले व पुढे या परिवारास योग्य ती मदत करू असे आश्वासन करण्यात केले . उपस्थित ग्रामस्त बंधु , भगिनी व त्यांचे लहान लहान मुल सर्वच डसा डसा रडतांना बघुन सर्वाचे डोळे पानावले होते .

 

जय विश्वकर्मा...!!!

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

मोबाईल ९८६९३५८८६४

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216