|
दि.१५ ऑगस्ट रोजी अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीच्या
नंदुरबार जिल्हा युवा मंडळाचा पहिला
वर्धापनदिन हा अखिल भारतीय श्री
विश्वकर्मा प्रबोधिनी चे नंदुरबार
जिल्ह्याचे मुख्य कार्यवाह
श्री.जितेंद्रभाई लोहार, व श्री
चक्रधर स्वामी शैक्षणिक मंडळ संचलित,
अस्थिव्यंग विकलांग आश्रम शाळेचे
चेअरमन श्री.गोविंद दादा, श्री.
उद्धवभाई पाटील यांच्या सह विध्यर्थीं
सोबत जल्लोषात साजरा करण्यात आला.
अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी ,जळगांव.
ही प्रामाणिक समाज कार्य करणारी एक
प्रसिद्ध लोहार समाजातील नामवंत संस्था
आहे. ह्या संस्थेची वाटचालीस जोरदार
सुरवात एका समाज कार्याचे वेड असलेल्या
खऱ्या समाज रत्नच्या संकल्पनेतून
निर्माण झाली. ही संस्था म्हणजे,
समाजात फक्त समाजकार्य करणारी, समाजात
राजकारण करणार्यानं विरोधी आवाज उठवीत
प्रामाणिक समाज कार्य करणारी
निःस्वार्थ संस्था होय.
ह्या
श्री प्रबोधिनीच्या कार्यात जेष्टां
सोबत त्यांच्या मार्गदर्शनात युवाशक्ती
चा नवीन तंत्रज्ञानासह युवा शक्तीचा
खरा वापर समाज कार्यासाठी व्हावा
म्हणून, लोहार समाजात पहिल्यांदाच
समाज कार्यात युवकांचा समावेश करण्यात
आला. त्यांना समाज कार्यात बरोबरीने,
खांद्याला खांदा लावून कार्य करण्याची
संधी उपलब्ध करून दिली. ती,
मा.श्री.प्राचार्य डॉ.अनिलजी लोहार सर
यांनी.
आत्ता
पर्यंत युवकांना समाज कार्यात सोबत
घेतले जात नव्होते, त्याचे कारण
अद्यापही गुलदस्त्यात आहे.
मात्र, ही संधी युकांना उपलब्ध करुन
दिली ती अखिल भारतीय श्री विश्वकर्मा
प्रबोधिनीच्या माध्यमातून. त्या नंतर
श्री प्रबोधिनी च्या अखिल भारतीय युवा
मंडळा ची स्थापना झाली.
त्यात,नंदुरबार जिल्ह्या युवा मंडळाची
स्थापना १५ ऑगष्ट २०१६ रोजी झाली. समाजातील
युकांना एक आदर्श अध्यक्ष दिले ते
जळगांव येथील श्री.जितेंद्र लोहार. एक
युवा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते
म्हणून त्यांची आधीच प्रचिती आहे.
त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात
तिन्ही राज्यात ह्या युवा मंडळाचे
कार्य प्रामाणिक पणे सुरू केले.
त्यात अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये
बंद पाडण्यात आलेले व थांबलेले समाज
कार्य ह्या गुजरात राज्यातील युकांनी
पुन्हां समाजकार्य जोमात सुरू केले.
त्यात त्यांनी अनेक उपक्रमही यशस्वी
पणे राबविले.
गुजरात राज्यातील समाजातील माझ्या
युवांनी येथील जेष्टांच्या
मार्गदर्शनात तेथील समाज कार्य पुन्हां
उदयास आणले हे नाकारुन चालणार नाही.
युकांना
बळ देणारे खरे प्रामाणिक समाज सेवक
यांनी युकांची शक्ती ओळखली व समाजात
कार्य करण्याची बरोबरीने संधी युकांना
उपलब्ध करुन दिली. ती कुणीही जाणली
नाही. केले नाही.! कारण, त्यांना
त्यांच्या खुर्ची हरणाची भीती मनस्वी
कायम सतावत असते.
मात्र, युवांना कार्य हवे चर्य नव्हे.
कारण आज आपले जगप्रसिद्ध लाडके
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी
साहेबांनी युवा शक्तीला जगा समोर
आणले. तसेच, माझ्या लोहार समाजात
युवांना समाज कार्यात कोणी आणले असेल
तर ते फक्त आणि फक्त मा.प्राचार्य
डॉ.अनिलजी लोहार सरांनी.
आज
दि.१५ ऑगस्ट २०१७ रोजी ह्या अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी
नंदुरबार जिल्हा युवा मंडळाला एक वर्ष
पूर्ण होत आहेत. आज वर्ष पूर्ती
वर्धापन दिन. युवामंडळाने आत्ता
पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात समाजासाठी
अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यात
ऐतिहासिक उद्योग महामेळावा तिन्ही
राज्यात चर्चेचा विषय ठरला. अनेकांना
आपल्या पारंपारिक व्यवसायाला द्रुतगती
पद्धतीने सादर करण्याचे आपले हक्काचे
व्यासपीठ उपलब्ध झाले. ह्या यशस्वी
कार्यामुळे काहींच्या भुवया ही
उंचावल्या तर अनेकांनी ह्या कार्याची
प्रशंसा करीत शुभ आशिष ह्या नंदुरबार
जिल्ह्यातील युकांना दिले.
आज
पुन्हां श्री. प्राचार्य डॉ. अनिलजी
लोहार सरांच्या मार्गदर्शनात ह्या १५
ऑगस्ट च्या वर्धापनदिनी शहादा येथे
श्री चक्रधर स्वामी विकलांग शाळेत
जिल्हा युवा मंडळा तर्फे साऱ्या
पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या
उपस्थितीत तेथील विध्यर्थींना फळे ईतर
साहित्य वाटप करून त्यांच्याशी विशेष
संवाद साधत प्रथम वर्धापन जल्लोषात
साजरा करण्यात आला.
त्यात श्री प्रबोधिनी युवा मंडळाच्या
कार्याबद्दल संबधीत संस्थेचे अध्यक्ष,
संचालक मंडळ व मुख्याध्यापक यांनी
माहिती जाणून घेतली. व त्यांनी युवांचा
कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. व
आशिर्वाद पर आभार मानले.
ह्या
कार्यक्रमात अखिल भारतीय श्री
विश्वकर्मा प्रबोधिनी नंदुरबार
जिह्याचे मुख्यकार्यवाह श्री.
जितेंद्रभाई लोहार,युवाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष
श्री. योगेशभाई लोहार, अखिल भारतीय
श्री. विश्वकर्मा प्रबोधिनी चे
प्रसिद्धी प्रमुख श्री.रुपेश
जाधव,जिल्ह्याचे कार्यवाह
श्री.राकेशभाई लोहार, युवाचे
जिल्हाकार्यवाह श्री. जयंतभाई लोहार,
अक्कलकुवा तालुक्याचे युवा अध्यक्ष
श्री.जयेशभाई लोहार, मुख्य मंडळाचे
सदस्य श्री.उमेशभाई लोहार,शहादा
तालुक्याचे कार्यवाह श्री.गोकुळभाई
लोहार, धडगावं तालुक्याचे कार्यवाह
मा. हरिषभाई लोहार, योगेशभाई लोहार,
मोहितभाई लोहार,प्रविणभाई लोहार आदींची
उपस्थिती होती.
आज खरच
साऱ्या युवांनी युवा मंडळाचे वर्षभराचे
कार्य सफल झाल्याचे समाधान व्यक्त
केले.
जय
विश्वकर्मा....!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
(शाहादा
बातमीदार)
श्री
रूपेश अंबालाल जाधव
माजी
अघ्यक्ष - नाशिक मंडळ
मो .
९४२१४५२१४४
|