:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
  दिनांक ३०/०९/२०१८ 

बंधन बेडी तोडत हजारोच्या संख्येने समाज बंधु, भगिनींच्या उपस्थितीत राज्यस्तरीत पुरस्कार व टॅब्लेट वाटप कार्यक्रम भव्य दिव्य यशस्वी साजरा.

अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था
शिरपूर तालुका श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज बहुउद्देशीय मंडळ
         यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील दातृत्व व थोर समाज सेवकांच्या अनमोल सहकार्याने भव्य दिव्य असा ...
सन्मान सोहळा व गुणगौरव कार्यक्रम


दि. ३०/०९/२०१९ रोजी सकाळी १० : ०० वाजता , अग्रसेन भवन , शिरपूर येथे हजारोच्या संख्येने समाज बंधु- भगिनी व विद्यार्थी मित्राच्या उपस्थितीत आनंदमयमय वातावरणात यशस्वी संपन्न झाला .
         सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश

मा.श्री.चंद्रकांत राघोदास लोहार हे होते.
प्रमुख अतिथी शिरपूर नगरीचे लोकप्रिय आमदार 
मा.श्री. कांशीराम पावरा
मा.श्री. भुपेश भाई पटेल (उपनगराध्यक्ष) 
मा.श्री. प्रभाकरावजी चव्हाण (मा. नगराध्यक्ष)
मा.श्री.देवेंद्रजी राजपूत (नगरसेवक)
मा. श्री.विजयजी बाफना (अध्यक्ष स्वाभिमान प्रतिष्ठाण)
मा.श्री. रोहिदास गोविंदा लोहार , धुळे 
मा.श्री.डॉ.पापालाल उत्तम पवार ,धुळे
मा.श्री.कन्हैयालाल जगन्नाथ लोहार , लोणखेडा
मा.श्री.महेंद्र रोहिदास लोहार , औरंगाबाद 
मा.श्री.भगवान जगन्नाथ लोहार , प्रकाशा
मा.श्री.भिका वामन लोहार , शिरपुर
मा.श्री.मनोज रामदास लोहार , शिरपूर
मा.श्री सुकलाल मयाराम कु-हेकर ,कल्याण
मा.श्री राजेंद्र निंबालाल जाधव ,कल्याण
मा.श्री सुभाष रामदास लोहार , शिरपुर
मा.श्री दिपक लकडु लोहार , भिवंडी
मा.श्री गोपाल बाबुराव मकवाना ,चोपडा
मा.श्री प्रशांत रमेश जाधव ,नाशिक
मा.श्री. लक्ष्मण सांगोरे, जळगांव
मा.श्री. जयवंतराव गोकुळ लोहार, धुळे 
मा.श्री रामकृष्ण गजानन लोहार , चोपडा
मा.श्री राजेंद्र वल्लभ लोहार , अक्कलकुवा
मा.श्री आबाजी सांगोरे ,जळगांव
मा.श्री दिनेश पंढरीनाथ लोहार ,शिरपुर
मा.श्री कैलास भाई लोहार , सोनगीर
मा.श्री.ताराचंद मुरार जाधव त-हाडी
         अादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. मंचावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार म्हणुन त्यांना अाकर्षक ताम्रपट , बुके , व प्रबोधिनीचा मफलर देऊन अासनस्थ करण्यात अाले . इतिहासात नोंद व्हावी अशा सन्मान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी गुजरात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील समस्त समाजबांधव व माता-भगिनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

 🔺     सर्वप्रथम भगवान श्री.विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करण्यात अाले व दिपप्रज्वन उपस्थित मान्यवरांच्या कर-कमलांनी केले..सुमधुर वंदे मातरम या गीतांनी कार्यक्रमाला सुरवात झाली.

🔺     या सन्मान सोहळ्यात ६० राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी पैकी तब्बल ५५ पुरस्कारार्थी उपस्थित होते व त्यांना मराठमोळ फेटा बांधून मानपत्र , प्रबोधिनीचे छापील मफलर व बुके देऊन सन्मानाने मा. आमदार श्री काशीनाथजी पावरा व मा. श्री भुपेशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले . त्यात 
राज्यस्तरीय खान्देश रत्न पुरस्कार 
रणरागिणी तेजस्विनी पुरस्कार
राज्यस्तरीय अारोग्य रत्न
राज्यस्तरीय कृषी रत्न
राज्यस्तरीय समाजसेवक
राज्यस्तरीय कानून रत्न
राज्यस्तरीय शिक्षण रत्न
राज्यस्तरीय खेळ रत्न
राज्यस्तरीय साहित्य रत्न
राज्यस्तरीय कला रत्न 
राज्यस्तरीय उद्योग रत्न 
          अशा विविध क्षेत्रात अतुल्य कामगिरी करणाऱ्या समाज बांधव व भगिनींना सदरचे पुरस्कार अादराने प्रदान करण्यात आले.
(पुरस्कारार्थीची सविस्तर माहिती पुढिल पोस्ट द्वारा)

🔺     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधिनीचे अध्यक्ष मा.श्री.युवराज जाधव यांनी केले . त्यात त्यांनी येत्या काही दिवसात गरजू माता भगिनी यांना सक्षम करण्यासाठी २० शिलाई मशीन वाटप करू व युवकांनसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भव्य स्वरूपात रोजगार मेळावा आयोजन होईल . तसेच समाजाचा सर्वात मोठा बिकट प्रश्न उपवर मुला मुलींचा प्रश्न तो सोडवण्यासाठी सर्व शाखीय लोहार समाजाचा वधुवर - पालक परिचय व सामूहिक विवाह आयोजन भव्य स्वरूपात करू त्याची रूपरेषा तयार करण्यात आली आली आहे व कार्यकर्तेनी सज्ज राहून जोरदार तयारीला लागा . या घोषणेने उपस्थित समाज बंधु - भगिनी यानी जोरदार टाळ्या वाजवून जोषमय सहमती दर्शवली . 

🔺     पुरस्कारार्थी समाजबांधव यांना मिळालेल्या मानपत्रावरील मजकुर वाचुन बहुसंख्य समाजबांधव भारावले,गहिवरले...

🔺     कार्यक्रमाचे खास अाकर्षण म्हणजे गुणवान विद्यार्थ्यांना एकुण १५ टॅब्लेट (Tab) चे वितरण करण्यात अाले . तसेच दहावी , बारावी , पदवी व पदविकेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांना प्रशस्तीपत्रक , ट्राफी व गोल्डमेडल देऊन सन्मानीत करण्यात अाले .

🔺     समस्त लोहार समाज आता लोहार समाजाचे एकमेव व कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून युवराज जाधव कडे पाहत आहे व क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान राजस्थानहुन पगडी , जळगाव हुन सन्मान पत्र व जरशी तसेच शिरपूरहून एक सुंदर केन देऊन सन्मानित केले होते तर या कार्यक्रमात प्रशांत ताराचंद लोहार सर (ड्राइंग टीचर आर सी पटेल) यांनी स्वत:च्या हाताने प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री युवराज जाधव याचे हुबेहूब स्केच तयार केलेले ते सन्मान जनक दिले .

🔺     शिरपूर क्रिकेट टीमचा सत्कार व शैक्षणिक साहित्य स्कुलब्येगचे वितरण करण्यात आले .

🔺     मा.श्री.भुपेशभाई पटेल व मा.श्री.रावसाहेब चव्हाण यांनी अापल्या मगोगतात प्रबोधिनीच्या कार्याचे व नियोजनाचे तोंडभरुन कौतुक केले.

🔺     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा.श्री.संजय बाबुलाल लोहार सर व श्री.सतिष जाधव यांनी केले.

🔺     अाभार प्रदर्शन मा.श्री.युवराज जाधव यांनी केले.

🔺     कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न
श्री. जितेंद्र माधवराव परमार 
श्री. विलास रमेश सांगोरे
श्री. ढोलन नगीनदास लोहार
श्री. योगेश कन्हेयालाल चव्हाण 
श्री. संजय मगन लोहार
श्री. मुकेशभाई लोहार
श्री. संदीप भिका लोहार
चि. हसमुख रामलाल लोहार
श्री. परेशभाई लोहार
श्री. गणेशभाई लोहार
श्री. भरतभाई लोहार
श्री. जयेशभाई लोहार
श्री. चंद्रशेखरभाई लोहार 
चि. संकेत मनोज लोहार
चि. उमेश सुभाष लोहार
चि. विलास शांताराम लोहार
        व सर्व कार्यकर्तेनी अथक परिश्रम केले .

🔺      शेवटी आभार प्रदर्शन होऊन राष्ट्रगीताने व स्नेहभोजनाचा अास्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली....!!
 

~•═════• 🔮 •═════•~

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

गाडीलोहार समाज मंडळ कल्याण

सर्व कार्यकारणी पदाधिकरी व समाज

मोबाईल ९८६९३५८८६४


   

 

 
     
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216