|
दि.३० जुलै २०१७ रोजी
तळोदा बहुद्देशीय लोहार समाज मंडळाची
निवडणूक झाली.
त्यात उपाध्यक्षपदी श्री.भरतभाई
लक्ष्मण लोहार यांची निवड झाल्याने
त्यांच्या कार्याची दखल घेत, अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीच्या
नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व
जिल्हा युवा मंडळाच्या पदाधिकार्यां
कडून त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात
आला.
दि.६ ऑगस्ट २०१७ रोजी तळोदा येथिल
तालुका मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष
श्री.भरतभाई लोहार यांच्या घरी अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीच्या
पदाधिकार्यांनी श्री. दिलीपभाई लोहार
यांच्या अध्यक्षतेखाली श्री विश्वकर्मा
भगवंतांच्या प्रतिमापूजन करुन बैठक
घेत श्री.भरतभाई लोहार यांच्या यथोचित
जाहीर सत्कार करण्यात आला.
ह्या प्रसंगी अखिल भारतीय श्री
विश्वकर्मा प्रबोधिनी मंडळाचे
कार्यवाह श्री. जितेंद्रभाई लोहार,
अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी
मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख
श्री.रूपेशभाई लोहार, श्री प्रबोधिनी
चे कार्यवाह श्री.राकेशभाई लोहार,
श्री विश्वकर्मा प्रबोधिनी युवा
मंडळाचे जिल्हा अध्यक्ष श्री.योगेशभाई
लोहार, अखिल भारतीय श्री विश्वकर्मा
प्रबोधिनी युवा मंडळाचे जिल्हा
कार्याध्यक्ष श्री.मुकेशभाई
लोहार,जिल्हा युवा मंडळाचे कार्यवाहक
श्री मनोजभाई लोहार , जिल्हा युवा
मंडळाचे कार्यवाहक श्री जयंतभाई लोहार,
तळोदा तालुका युवा मंडळाचे अध्यक्ष
श्री.भरतभाई लोहार, तळोदा तालुका युवा
मंडळाचे कार्यवाह संदीपभाई लोहार
तळोदा तालुका युवा मंडळाचे कार्यवाहक
शेखरभाई लोहार, अक्कलकुवा तालुका युवा
मंडळाचे कार्यवाहक श्री चंद्रशेखरभाई
लोहार ,अक्कलकुवा तालुका युवा मंडळाचे
सदस्य श्री. उमेशभाई लोहार,(अक्कलकुवा)
आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी अध्यक्ष यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन करीत तळोदा तालुका समाज
बांधवांचे ह्या अध्यक्ष -उपाध्यक्ष
निवडीबद्दल शुभेच्छा देत आभार व्यक्त
केले.
ते
पुढे म्हणाले की समाजात अनेक ठिकाणी
दुफळी निर्माण करणाऱ्यांचे मोठ्या
प्रमाणात पीक आले आहे. ते फक्त संधीची
वाट पाहत असतात. अश्या संधीसाधू पासून
आपण सावध राहिले पाहिजे. तळोदा
बहूऊद्देशिय समाज मंडळाच्या नवनियुक्त
उपाध्यक्ष हे त्यांच्या कार्यकाळात
निश्चितच चांगले समाज कार्य करतील याचा
अम्हाला विश्वास आहे.
श्री प्रबोधिनीचे प्रसिद्धी प्रमुख
रुपेश जाधव यांनी ह्या प्रसंगी
बोलतांना संगीतले की, येत्या महिन्यात
श्री प्रबोधिनी तर्फे गुणवंत गरजू
विध्यार्थीना शिष्यवृत्ती, सायकल वाटप
सह उद्योजक नारीशक्ती चा भव्य सन्मान
सोहळा आयोजित केला आहे.
तरी
त्या साठी आपण नेहमी प्रमाणे आप-आपल्या
परीने जोरदार समाज हितासाठी कामास लागा.
समाजकारण सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने
आपले कार्याची पावती प्रत्येक
कार्यक्रमातून आपल्याला मिळत आहे. आपले
प्रत्येक कार्य ऐतिहासिक झाले आहेत.
हा भव्य कार्यक्रम ही ऐतीहासिकच होईल.
कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे
स्त्री असते, ह्या माय माऊलीचा जय
जयकार झालाच पाहिजे, ही कल्पना
प्रत्यक्षात आणण्याचे ठरवीले ते अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी चे
जनक प्राचार्य डॉ अनिलजी लोहार सरांनी.
हा त्यांनीच शोधलेला उपक्रम आहे.आत्ता
हे दर वर्षी सुरुच राहील. तरी
शिष्यवृत्ती व सन्मानर्थी चे मूळ
कागदपत्र त्वरित पाठवावे व तीन्ही
राज्यातील आपल्या नातेवाईकांची
कागदपत्रे लवकरात लवकर पूर्ण करुन
आमच्या पर्यंत पोचविण्याचे आव्हान केले.
ह्या
प्रसंगी अखिल भारतीय श्री विश्वकर्मा
प्रबोधिनी मंडळाचे कार्यवाह श्री.
जितेंद्रभाई लोहार यांच्या सह
श्री.राकेशभाई लोहार, श्री. मुकेशभाई
लोहार , श्री. योगेशभाई लोहार,
श्री.भरतभाई लोहार, श्री.जयंतभाई
लोहार, श्री.मनोजभाई लोहार,श्री.
संदीपभाई लोहार,श्री.शेखरभाई लोहार ,
श्री चंद्रशेखरभाई लोहार यांनीही
मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थितांचे आभार जिल्हा
कार्यध्यक्ष श्री. मुकेशभाई लोहार
यांनी मानले. ह्या प्रसंगी अखिल
भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी चे
सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित
होते.
जय विश्वकर्मा...!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( शहादा
- बातमीदार )
श्री रूपेश
अंबालाल जाधव
मोबाईल - ९४२१४५२१४४ |