:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक २९\०१\२०१   व्हिडीओ पहा

कल्याण मंडळ द्वारे ' श्री विश्वकर्मा जयंती ' भव्य स्वरुपात साजरी

          गाडीलोहार समाज उन्नती मंडळ कल्याण द्वारा सालाबाद प्रमाणे दि.२९\०१\२०१८ रोजी कल्याण येथे


श्री विश्वकर्मा जयंती उत्सव


भव्य स्वरुपात " उद्योग दिवस " म्हणुन साजरी करण्यात आला . या कार्यक्रमाचे अघ्यक्ष स्थान


मा. न्यायाधीश श्री सी.आर.लोहार

यांनी भूषविले व प्रमुख अतिथि म्हणुन...
श्री ईश्वरलाल केशव राठोड
श्री राजेंद्र छनलाल निळे
श्री सुनिल धोंडु गोराणे
श्री पांडुरंग भगवान सुर्यवंशी
श्री राजेंद्र मक्कन गोराणे
श्री सोमनवंशी साहेब
श्री जावणे सर (अंबरनाथ)
श्री गोपालभाई कुकावलकर
श्री ड्रॉ. प्रशांत मकवाना सर
श्री नरेंद्र मधुकर फडके
श्री आर .टी . लोहार
उपस्थित होते . व कार्यक्रम खालील प्रमाणे नियोजन बद्ध संपन्न झाला ज्यात..
आपल्या लोहार समाजाचे अराध्य दैवत भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन व द्विप प्रज्वलन करुण प्रसाद वाटप करण्यात आले .
कार्यक्रमास " वंदे मातरम् " या राष्ट्रीय गीताने सुरवात झाली .
महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले व विजेत्या ठरलेल्या ..


" सौ. नीता प्रभुदास पवार "


या भगिनीला प्रमाण पत्र व सुहासिनिंच्या हस्ते सुंदर साडी पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आली .
विद्यार्थ्यांनसाठी डान्स व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , ज्यात २५ विद्यार्थ्यानी भाग घेतला , डान्स मधे ...


प्रथम - कु.भूमिका दिपक लोहार
( ७०० रुपये रोख , सन्मानपत्र , पुष्पगुच्छ व सुंदर वॉटर बॉटल )
द्वितीय - कु. प्रेरणा युवराज जाधव
( ५०० रुपये रोख , सन्मान पत्र , पुष्पगुच्छ व सुंदर वॉटर बॉटल )
तृतीय - रोहित दिपक लोहार
(३०० रुपये रोख , सन्मानपत्र , पुष्पगुच्छ व सुंदर वॉटर बॉटल )


          देऊन विजेते ठरलेल्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान देवुन कौतुक करण्यात आले .
तसेच शालेय विविध दहा क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेला विद्यार्थी..


चि. रोनक धनराज गोराणे


याचा ही प्रमुख अतिथीच्या हस्ते गौरव करण्यात आला .
विशेष बाब ...सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष सुंदर वॉटर बॉटल देऊन देवुन सन्मानीत करण्यात आले .
लोहार समाजाचे पहिले न्यूज चैनल.. " विश्वकर्मा न्यूज '' या नावाने प्रमुख अतिथिंच्या हस्ते समाजास अर्पण करण्यात आले .


www.gadiloharsamajkalyan.com


या वेबसाइट बाबत सविस्तर माहिती समाजाला मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली . त्यासाठी ...


श्री शेखरभाई लोहार
(कार्यवाह - प्रबोधिनी युवा मंडळ)
यांनी प्रोजेक्टर तसेच लॉपटॉप ...
चि.सौरभ राजेंद्र जाधव


यांनी ऑव्हलेबल करुण दिले म्हणुन त्यांचे विशेष आभार .


कार्यक्रमासाठी समाज बंधुनी कल्याण मंडळासाठी अपेक्षे पेक्षा हि जबरदस्त असा निधि स्वेच्छेने दिला , त्यांचा लेखाजोखा त्याच दिवशी समाजाला समजावुन सांगण्यात आला .
कार्यक्रमाचा सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे कल्याण मंडळाची एकजुटता व एक सूत्री पणा कार्यकारणीतील तेरा पदाधिकारिणी एक सारखे सफेद कुर्ता व भगवे फेटेे परिधान करुण दाखविली .
अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश श्री सी.आर. लोहार यांनी संपूर्ण कल्याण मंडळ कार्यकारणी व समाजाने एक समाज हिताचा सुंदर कार्यक्रम केला , असे न्यायोचित जजमेंट रूपी मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कल्याण मंडळाची कार्यकारणी ...


श्री युवराज मुरार जाधव
श्री राजेंद्र निंबालाल जाधव
श्री सुकलाल मयाराम कु-हेकर
श्री दिपचंद धर्मदास राठोड
श्री प्रल्हाद दत्तात्रय कु-हेकर
श्री अनिल मक्कन गोराणे
श्री दिपक लकडु लोहार
श्री हनुमान शिवलाल लोहार
श्री धनराज रमन गोराणे
श्री किशोर ब्रिजलाल लोहार
श्री गणेश पुरुषोत्तम गोराणे
श्री निलेश गिरेंद्र लोहार
श्री निलेश रतिलाल पवार


व सर्व कल्याण मंडळाचे समाज बंधु व भगिनी यांनी विशेष योगदान दिले .
उपस्थित सर्व जनसमुदायाने सुरूचि जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रम यशस्वी झाला म्हणुन कार्यकारणीस शाबासकिचा अनमोलआशिर्वाद दिला .
शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले व " राष्ट्रगीताने " कार्यक्रमाचे समापन करण्यात आले .
जय विश्वकर्मा ...!!!


•═════• 🔮 •═════•
 

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

मोबाईल ९८६९३५८८६४


▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216