:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक :२६ ऑगस्ट २०१७

सार्वजनिक हितार्थ पटलं तर बघा ...!!!

"गरज आहे ती प्रत्येक भारतीयाने आपली मानसिकता बदलण्याची"

प्रत्येकाच्या जीवनात तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे (१) बाई (२) बाटली व (३) पैसा . आपले संपूर्ण जीवन या तीन गोष्टी भोवती फिरत असते . या तीन गोष्टी आपलं जगण्यासाठी जेवढ्या तारक आहेत , तेवढयाच त्यांचा मोहात अडकल्यास (अतिरिक्त झाल्यास) मारकही आहेत . 

       (१) बाई- समाजातील बऱ्याच लोकांचा बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक भोगवादाचा घटक म्हणून असतो. इथेच आपण फार मोठी चूक करतो. बाई ही केवळ स्री नसून क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता, आपली बहीण, मुलगी व मैत्रीणही असते. व ती एक अथांग प्रेमाचा सागर असते.

       (२) बाटली- बाटली म्हटलं की आपल्याला फक्त दारूची बाटली दिसते. किती संकुचित विचार आहेत आपले. बाटल्यांमध्ये पाण्याची बाटली, दुधाची बाटली, सलाईनची बाटली व इतर अनेक प्रकारच्या बाटल्यांचा समावेश होतो. आपल्या जीवनाची सुरुवातच मुळात मातेच्या दुधाने किंवा दुधाच्या बाटलीने होते हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. आपण नेहमीच म्हणतो 'जल हे जीवन है' मग पाण्याची बाटली किती महत्त्वाची! आणि ज्या वेळेस आपण खाण्यापिण्यापासून वंचित राहतो गंभीर (आजार आजारपणामध्ये) लाचार असतो , तेव्हा सालाईनची बाटलीच आपणास नवसंजीवनी देते. आणि आपले जीवन सुकर करते.

       (३) पैसा- जेवढा चांगला तेवढाच वाईट. म्हणून सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढाच कमवा. आपल्या पुढील सात पिढ्या बसून खातील ऐवढा कमवू नका. 'अति तिथे माती' हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या कष्टाचा, घामाचा पैसा विनाकारण घेऊ नका. तो तुम्हाला शांत झोप व सुखी, आरोग्यदायी जीवन देऊच शकत नाही. कोट्यावधी रुपये कमावणारे, मखमली गादीवर झोपणारे आज लाचार होऊन जमिनीवर झोपत आहेत, याची अनेक ज्वलंत उदाहरणे आपण आपल्या डोळ्यासमोर पाहत आहोत. मी काही मोठा ज्ञानी नाही परंतु सत्य हे आहे की, हे सर्व आपल्याला कळत पण वळत नाही पैशांवर लिहण्यासारखे भरपूर आहे, कितीही लिहलं तरी अपुरं आहे, कारण जन्मापासून ते मरेपर्यंत आपण सर्व पैसा भोवतीच फिरत असतो. आणि आपण पैशालाच सर्व काही मानतो ही फार मोठी घोडचूक करतो. घोडचूक हा शब्द मुद्दाम वापरला कारण, जसा घोड्याला झापडी बांधल्यानंतर फक्त समोरचंच दिसतो तद् वत आपल्याला फक्त पैसाच दिसतो. पैसा व्यतिरिक्त नाते संबंध, प्रेम, भावना, माणुसकी, कर्तव्य, कर्म या गोष्टी कधी दिसतच नाहीत. आज आपण समाजात पाहतो की, डॉक्टर, इंजिनिअर किंवा इतर उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी, शिक्षण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, नोकरीत बढती किंवा सुधारित वेतनश्रेणी मिळवण्यासाठी, नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शन मिळवण्यासाठी, एखादे मंत्रिपद मिळवण्यासाठी, अल्पमतातील सरकार स्थापनेसाठी घोडेबाजार, व्यवसाय सुरू करण्यासाठी, घराकरिता कर्ज मंजूर करण्यासाठी, लग्नामध्ये हुंड्यासाठी, नाही जमलं तर मोडण्यासाठी, एवढच नाही तर अगदी सरते शेवटी एखाद्याचा अपघाताने मृत्यू झाल्यास त्याची केस दडपण्यासाठी अथवा पोस्टमॉर्टम लवकर करून मिळविण्यासाठी सर्रास, हजारो लाखो, करोडो रुपयांचे व्यवहार केले जातात, हे सर्व पाहून माझे मन खूप व्यथित होते. खरं म्हणजे अशा प्रकारची सर्व काम करणाऱ्यां कर्मचाऱ्याला किंवा संस्थेला योग्य तो पगार / कामाचा मोबदला दिला जातो. मग वरून ही पैशाची देवाण घेवाण कशासाठी ? यालाच तर भ्रष्टाचार म्हणतो. या दुष्टचक्रास आपणच सर्वजण कारणीभूत आहोत. सध्या देशामध्ये व समाजामध्ये हिंसाचार, अत्याचार, खून, बलात्कार आत्महत्या (शेतकरी, विद्यार्थी, मुली, स्त्रिया, पुरुष) ह्या केवळ भ्रष्टाचारामुळे वाढत आहेत. दिवसेंदिवस देश कर्जबाजारी होत आहे. आणि आम्ही मूग गिळून गप्प बसलो आहोत. आणि दोष मात्र सरकारला देत आहोत. स्विच बँकेतील व देशांमधील भ्रष्टाचाराचा पैसा एकत्र आल्यास आपला देश सहजपणे कर्ज मुक्त होईल, याची मला पूर्ण खात्री आहे.

          सरकार फक्त घटनेनुसार काम करते, कायदे करते. न्यायपालिका कायद्यानुसार न्याय देते. जोपर्यन्त कायदा नसतो. तोपर्यन्त न्यायालय काहीच करू शकत नाही. मग न्यायालय पुन्हा कायदा किंवा कायद्यात सुधारणा / बदल करायला सरकारला सांगते. शेवटी पुन्हा सरकार आणि सरकार निवडून देण्याचा फार मोठा अधिकार भारतीय राज्यघटनेने आम्हा भारतीय नागरिकांच्या हातात दिला आहे. हे आपण सोयीस्करपणे विसरतो. हे सर्व दृष्टचक्र थांबवयाचे असेल तर, आम्ही प्रत्येक भारतीय नागरिकाने जागृत झालं पाहिजे व मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे. मतदान करतांना कोणत्याही पक्षात / उमेदवाराच्या मोहाला बळी न पडता फक्त उच्चविद्याविभूषित व प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी देश बदलणार नाही. कारण सरकार बदलले की, लगेच कार्यकर्ते पक्ष बदलतात . कारण त्यांना पक्षासी काही घेणेदेणे नसते. त्यांना फक्त सत्ता हवी असते. आणि सत्तेसाठी ते काहीही करू शकतात. सध्या देशामध्ये वाढत जाणारा हिंसाचार, जातीवाद, धार्मिक तेढ व आरक्षणासाठी होत असलेले वेगवेगळ्या संघटनाचे मोर्चे ही याची ज्वलंत उदाहरणे आहेत. हे आम्ही सर्व सामान्य भारतीय नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. यासाठी गरज आहे ती स्वतामध्ये बदल घडविण्याची. " विचार बदला तर देश बदलले "

       सध्या प्रसारमाध्ये ही विकली जातात, त्यांनी असं करू नये चुकीची माहिती / अफवा पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणावे. मला असे वाटते की, या देशातील सर्व जातीभेद नष्ट करुण फक्त " मनुष्य " ही एकच जात आणि "माणुसकी" हा एकच धर्म ठेऊन "सर्वधर्मसमभाव" जपला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे जतन होऊन, पैशाच महत्व कमी होईल. गरीब / श्रीमंत, उच्च / नीच असे आपसातील मतभेद मिटुन माणुसकीचे दर्शन घडेल. सर्व भारतीयांमध्ये आपुलकी, प्रेम आहे, ही भारतीय प्रतिज्ञा खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल. एक भारतीय नागरिक म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे.

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

आपला

आदर्श शिक्षक

कल्याण मंडळ अंतर्गत

(नाव लिहण्यास मना केले)

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216