:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक २४\०९\२०१७

अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था द्वारा आयोजित महिला सन्मान सोहळा नवरात्रीच्या पावन  पर्वात अत्यंत थाटात व जल्लोषात संपन्न

धुळे : दि २४/०९/२०१७ रोजी अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीसंस्था द्वारा आयोजित गाडीलोहार समाजातील... 

२५ उद्योजक महिलांचा सन्मान.

कर्तृत्वान समाज बांधवांचा सन्मान.

कर्तृत्वान जेष्ठाचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान.

विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव.

इ.१० वी व इ.१२वीच्या गरजु ३३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण.

गरजू २४ विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण.

     भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख अतिथीच्या मार्गदर्शना खाली व भव्य समाज बंधु , भगिणीच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात संपन्न झाला ...

प्रमुख अतिथी

श्री.शिरीषदादा चौधरी

(आमदार अमळनेर विधान सभा)

सौ. कल्पनाताई महाले

(महापौर धुळे महांनगर पालिका)

मा. श्री रोहीदास गोविंदा लोहार

(ज्येष्ठ समाज सेवक मा.अघ्यक्ष धुळे मंडळ)

मा. श्री. दिलीपजी वसव

(संस्थापक अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य)

प्रा. डॉ. अनिल लोहार सर

(प्रबोधिनीचे मुख्य समन्वयक)

मा.श्री युवराज मुरार जाधव

( प्रबोधिनी मंडळाचे कार्याध्यक्ष)

प्रा.पापालाल उत्तम पवार

(अघ्यक्ष धुळे मंडळ)

श्री.एन.आर. लोहार

(ज्येष्ठ समाज सेवक)

मा.श्री. जितेंद्र सुभाष चव्हाण

(प्रबोधिनी युवा मंडळाचे अघ्यक्ष)

     यांच्या हस्ते दिमाखदार व नेत्रदीपक सोहळा धुळे येथील वेदांत मंगल कार्यालय येथे संगीतमय वातावरणात पार पडला . कार्यक्रमाची सुरवात श्री विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली . प्रमुख पाहुण्यांचे स्वागत धुळे येथील कु.वैष्णवी संजय जाधव व श्री.संजय जाधव तसेच सौ . रेखा अमोल सूर्यवंशी यांनी आपल्या सुमधुर स्वागत गीताने करण्यात आले. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल लोहार सर यांनी केले. २-३ वर्षाच्या प्रवासात प्रबोधिनीने आजपर्यंत गतकाळात कधीही न झालेले  समाजोपयोगी कार्यक्रम तसेच युवा वर्गासाठी क्रिकेट स्पर्धा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर इ. कार्यक्रम प्रबोधिनीद्वारे आयोजित करण्यात आले भावी काळात देखील या पेक्षाही चांगले उपक्रम प्रबोधिनी राबवले असे प्रा.अनिल लोहार सर यांनी सांगितले. 

       श्री युवराज जाधव यांनी आपल्या जोषमय मनोगताने उपस्थित समाज बंधु भगिनीचे मने जिंकून घेत समाजाला विकासाकडे नेण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग संघटित होवुन कार्य करा व त्यासाठी उत्तम असे व्यासपीठ प्रबोधिनी नावाची संस्था समाजात अग्रेसर आहे . माणसाची इच्छा शक्ती जर तीव्र असली तर कुठले ही कार्य करणे अशक्य नाही व त्यांनी बारामती मॅरेथॉन येथील ६५ वर्षाच्या लता भगवान नावाची महिलेने जिंकली हे उदाहरण देवुन समाजाला पटवून दिले .

       श्री दिलीपजी वसव यांनी आपल्या मनोगतात सर्व लोहार गाडी लोहार समाज संघटित होणे गरजेचे आहे आणि ती सुरवात झाली आहे असे पटवून दिले .

       मा.आमदार श्री शिरिशजी चौधरी यांनी आपले मनोगत सो सोनार की एक लोहार की या वाक्याने सुरवात केली व लोहार समाजाच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी मी सदैव पाठीशी राहीन असे आश्वासन दिले .

       या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र , गुजराथ , मध्यप्रदेश या तीन राज्यातुन लोहार समाज उपस्थितीत होते तसेच विविध मंडळाचे अघ्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून महत्वपूर्ण योगदान दिले ज्यात ....

विविध मंडळाचे अघ्यक्ष पदाधिकारी

               महाराष्ट्र

श्री कैलास लोहार (सोनगीर)

श्री संजयजी लोहार (दोडाईचा)

श्री राम गोराणे (नाशिक)

श्री दिनेशभाई लोहार (शिरपुर तालुका)

श्री पापालाल पवार (धुळे अघ्यक्ष)

श्री रविंद्र लोहार (उपाघ्यक्ष शहादा)

श्री कन्हैयालालजी चव्हाण(शहादा ता)

श्री माधवभाईजी लोहार (नंदुरबार)

श्री राजेन्द्र जाधव(सचिव कल्याण)

श्री मच्छिन्द्रजी लोहार (अक्कलकुवा)

श्री भरतभाई लोहार (उपाघ्यक्ष तळोदा)

श्री राकेश लोहार (लोनखेड़ा प्र.)

श्री अशोक लोहार(मा.अ.शिंदखेड़ा)

श्री सुभाष लोहार (बाहदरपुर)

श्री श्री अंबादास लोहार (एरंडोल)

श्री सुभाषजी सांगोरे (जळगाव प्र)

श्री प्रदिप पवार सर(औरगाबाद प्र)

श्री एच.आर.सुर्यवंशी (पुणे प्र .)

श्री योगेश लोहार (पारोळा प्र.)

श्री नागेशभाई लोहार (मा.अ.वसई)

श्री प्रल्हाद लोहार सर(अमळनेर प्र.)

श्री सुदामजी गोराणे(नवापुर चिंचपाडा)

श्री राजेंद्रजी लोहार (खापर प्र.)

               गुजराथ

श्री माधवभाई लोहार  (नवसारी)

श्री कांतीलाल लोहार(उपाघ्यक्ष सुरत)

श्री अश्विनभाई पांचाल ( वासदा )

श्री राजेन्द्र लोहार (वडोदरा प्र.)

            मध्यप्रदेश

श्री मगनभाई लोहार ( इंदौर )

श्री भगवान लोहार (पानसेमल)

       हजारोच्या संख्याने समाज बंधु , भगिनीची उपस्थिती होती , या उपस्थिती वरुण प्रबोधिनीच्या चालु असलेल्या समाजभिमुख कार्यक्रमासाठी समाजाचा उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे म्हणूनच प्रबोधिनी ऐतिहासिक कार्यक्रम घडवुन आणत आहे व पुढे सुद्धा नवनविन उपक्रम राबवून समाज विकासाचा रथ सदैव गतिमान मार्गाक्रम राहील .

तसेच काही अघ्यक्ष पदाधिकारीची नाव नजर चुकीने सुटले असेल त्या बद्दल दिलगीरी व्यक्त करण्यात आली  ...

       कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.संजय बाबुलाल लोहार सर ,प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष श्री.युवराज जाधव तसेच प्रबोधिनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.रुपेश जाधव यांनी केले तसेच जमा खर्चचा चोख कार्य बघितले ते श्री जितेंद्रजी परमार , श्री विलासजी सांगोरे , श्री सुनीलजी लोटन लोहार व श्री ढोलनजी लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले , व कार्यक्रमाच्या सुरवाती पासुन तर शेवट पर्यत् हवे सारखा इकडून तिकडे पळपळ करुण परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य लाभले ते प्रबोधिनीचे सचिव श्री सतीष विठ्ठल जाधव , श्री संजय नारायण जाधव , श्री योगेश चव्हाण , श्री राकेशभाई लोहार , श्री प्रदिप नथ्थु लोहार , श्री मुकेशभाई लोहार , श्री रविभाई लोहार , श्री संजयभाई लोहार , श्री विष्णुभाई लोहार , गोकुळभाई लोहार , श्री जयेशभाई लोहार , श्री चन्द्रशेखरभाई लोहार , श्री मनोजभाई लोहार , श्री शेखरभाई लोहार , श्री परेशभाई लोहार  व सर्व प्रबोधिनी कार्यकर्ते यांचे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोटतिडकीने काम करणारे शिलेदार यांनी अहोरात्र मेहनत घेतली अशा सर्व समाजबांधवांचे मनपूर्वक आभार !! 

*तसेच ज्या दात्यानी अशा पवित्र कार्यास भरभरुन मदत केली स्कॉलरशिप , सायकल , साउंड सिस्टिम , हॉल , प्रिटिंग , जेवण या सर्व दात्याचे मनपुर्वक सर्व समाजाने ह्रदया पासुन आभात व्यक्त केले व लवकरच दात्यानी दिलेले दानाचा लेखा जोखा समाजा समोर मांडला जाईल* 

तसेच धुळे येथील  स्थानिक  समाजबांधव यांनी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या या कामासाठी सहकार्य केले अशा सर्व समाजबांधवाचे देखील आभार !!! आणि सर्व समाजबांधव आपण खूप मोठ्या संख्यने उपस्थित राहून कार्यक्रमाला चार चांद लावले म्हणून आपले ही मनापासून प्रबोधिनी तर्फे आभार व्यक्त करण्यात आले..! शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. व सर्वच उपस्थितानी सुरूचि भोज व उपवासाच्या फराळाचा स्वाद घेत कार्यक्रम यशस्वी झाला म्हणुन कार्यकर्त्याना शाबासकिचा आशिर्वाद देवुन सुखरूप आप आपल्या घरी परतीला निघाले व सुखरूप घरी पोहचले .

*पुन्हा प्रबोधिनी द्वारा असाच एक दिमाखदार सोहळा आता नोहेम्बर महिण्यात ......... !!!*

*चला तर कार्यकर्त्यानो पुढील कार्यक्रम नोहेम्बर महिण्यात करू या यशस्वी लागा मग कामाला... जय विश्वकर्मा ...!!!*

             

         *जय विश्वकर्मा.....!!!!!*

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(धुळे बातमीदार)

श्री सतीष विठ्ठल जाधव

मोबाईल ९८६०६३४३०५

द्विप प्रज्वलन व प्रमुख अतिथि व विविध मंडळाच्या अघ्यक्ष पदाधिकारी यांचा सत्कार होतांना.

जीवन गौरव पुरस्कार / कर्तुत्व गौरव पुरस्कार / युवा प्रेरणा पुरस्कार प्रधान करतांना

नारी शक्तिचा आदर, समाजातील उद्योजक महिलांचा सन्मान होतांना.

विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा गौरव होतांना

३३ विद्यार्थ्याना स्कॉलरशिप इ .१० वी दोन हजार व इ.१२ वी तीन हजार रूपयाचा धनादेश व २४ विद्यार्थ्याना रुपये ३३०० ची दुचाकी सायकल वाटप होतांना

 

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216