|
विवाह समारंभ म्हटला म्हणजे
दोन परिवार, दोन जीवाचे एकत्र
येणे आणि याला संपन्न
करण्यासाठी मुली कडून व मुला
कडून सुरवाती पासुन जिव लावुन
मेहनत करावी लागते. प्रथम
मुलाला मुलगी पसंत आहे का ?
आहे तर मुलीला मुलगा पसंत आहे
का ? पसंत असेल तर गुण जमतात
का ? उच्च शिक्षित आहेत का ?
नौकरी जॉबला मुलगा आहे का ?
मुलगा, मुलगी सुंदर आहे का ?
अशा अनेक बाबी बघुन झाल्यावर
मग जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली
एक बैठक बसते मग देण्या
घेण्याच्या व विवाह संपन्न कसा
कारायच्या यावर तडजोड होते,
मग सर्वाची संमत्ती झाल्यावर
एक कार्यक्रम यशस्वी होतो तो
असतो विवाह. मी समाजात खुप
विवाह सोहळ्यास उपस्थित झालो
पण मला माझ्या नजरेत व मनात
घर करुण जाणारा एक आदर्श
विवाह सोहळा दि. २४\०४\२०१८
रोजी जळगाव जिल्ह्यात पाळधी
या गावात याच देही याच डोळे
मी बघितला तो असा ...
जगन्नाथ
हिरामण लोहार यांचे सुपुत्र
चि.गजानन जगन्नाथ लोहार हे
रेल्वेत कारपेंटर या पदावर
पाळधी येथे कार्यरत आहात पण
परमेश्वरानी त्यांना एका
पायांनी दिव्यांगत्व दिले.
श्री
राजेंद्र लक्ष्मण लोहार यांची
एकुलती एक सुकन्या कु . रोहिणी
इलेक्ट्रिकल इजीनिअर मूळ गाव
करणखेड़ा ह.मु. उधना,
यांचा
शुभ मंगल विवाह आनंदमय
वातावरणात संपन्न झाला. विशेष
म्हणजे मुलगा एका पायांनी
दिव्याग, उभे राहणे सुद्धा
जेमतेम पण मुलगी रोहिणी ही
इंजीनिअर हिने स्वत:च्या
हिमतीने कुठली ही अट न टाकता
गजानन यास आनंदात स्वीकार केले
व नुसते स्वीकारच नाही केले
तर अग्निला साक्ष्य मानुन सात
जन्माचे घट्ट नाते परमेश्वराकडे
मागून घेतले.
मी
स्वत: मुलींच्या आईशी लग्न
लागल्यावर बोललो तर त्या
मातेच्या तोडून उद्दगार
अस्मणीय होते की हां निर्णय
फक्त आणि फक्त माझी लेक आणि
जावाईचा आणि आम्ही त्यांना
आर्शीवाद दिला.
किती
मोठ्या मनाने त्या रोहिणी या
इंजिनीअर मुलीने गजानन यांच्या
सोबत संसार थाटला याचा आदर्श
सर्वानी घेणे जरूरी आहे. नाही
तर मुलगा काळा आहे म्हणुन
मुलगी नाही म्हणते, मुलगी
दिसायला चांगली नाही म्हणुन
नकार देतात आणि असे ही किस्से
होतांना बघितले आहेत. असो
परमेश्वर कु. रोहिणी व चि.
गजानन यांचे भावी आयुष्य
सुखमय, निरोगी व भरभराटीचे
जावो ही प्रभु चरणी प्रार्थना
करतो व भावी वाटचालीस हार्दिक
शुभेच्छा ...!!!
~•═════• •═════•~

(कल्याण बातमीदार)
श्री युवराज मुरार जाधव
मोबाईल
९८६९३५८८६४
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
|