|
सध्या आपल्या लोहार
समाजात समाजकारण पेक्षा राजकारणच
मोठ्या प्रमाणात होत असल्याची दुर्दैवी
घटना सर्वत्र राजरोस पणे घडत आहे. व
ह्या घटनेचा आसुरी आंनद काही दुष्कर्मी
घेत आहेत.
पडदयामागील
ह्या वाईट प्रवृत्तीचं असं राजकारण
विविध ठिकाणी आपल्या कतपुतली म्हणून
कार्य करणाऱ्या व्यक्तीं कडून करीत
असल्याचे ह्या काही काळात समोर आले आहे.
मात्र, हे सगळे प्रकार समाजाच्या
विकासाच्या दृष्टीने अतिशय घातक आहेत.
ह्या वाईट प्रवृत्ती समाजात तेढ, दुफळी
व तंटे निर्माण करुन आपली कु विचारांची
पोळी भाजण्याचे प्रकार करणाऱ्या
अश्यांचा समाजाने शोध घेऊन बंदोबस्त
करणे गरजेचे आहे.
शहादा तालुक्यातील गाडी लोहार
समाज मंडळ, पुनर्गठीत करण्यासाठी माजी
अध्यक्षांनी सार्या तालुक्यातील समाज
पिंजून काढला. आर्थिक अडचनींन मुळे
सर्वानुमते बंद करण्यात आलेल्या. शहादा
तालुका गाडी लोहार समाज मंडळाची पुन्हां
निर्मिती करुन तालुक्यात समाज कार्य
करण्यासाठी काही दिवसा पूर्वी माजी
अध्यक्ष श्री.कन्हैयालाल लोहार यांनी
शहादा तालुक्यातील सर्व समाज बांधवांना
एकत्र करुन दि.२० ऑगस्ट रोजी, शहादा
शहर गाडिलोहर समाज मंडळाच्या समाज
भवनात पुन्हां तालुका मंडळ स्थापन
करण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले
होते.
ह्या
सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून
म्हसवाद येथील श्री. गोविंदनाना लोहार
यांना करण्यात आले होते. त्यांच्या
सोबत व्यासपीठावर सोनवदचे श्री.
कचरूलला लोहार, श्री. बाबुदादा लोहार,
श्री.भटूलाल लोहार, शहादा शहराचे
अध्यक्ष श्री. राजेंद्रजी लोहार होते.
अध्यक्ष व उपस्थितांच्या हस्ते श्री
विश्वकर्मा भगवंताचे पूजन करण्यात
आले.व सभेला अध्यक्षांच्या परवानगीने
सुरवात करण्यात आली. तर मागील तालुका
मंडळ हे का बंद करण्यात आले. त्याची
परिपूर्ण माहिती व लेखा-जोखा
तालुक्याचे माजी अध्यक्ष
श्री.कन्हैयालाल लोहार यांनी वाचून
दाखवला. त्या नंतर सभेतील विषयांच्या
आधारावर नवीन अध्यक्ष पदासाठी विचार
विनिमय करावा. अशी सूचना मांडण्यात आली.
त्या आधारे श्री.रुपेश लोहार यांनी
सांगितले की, आपण ज्या भूमीत बसलो
आहोत. ती भूमी, स्व.शिक्षण महर्षी
आण्णा साहेब पी.के.पाटील यांची कर्म
भूमी आहे. त्यांनी स्वतःच्या समाजासाठी
सारे जीवन अर्पण केले होते. त्यांनी
समाजाला आज अग्रस्थानी नेला आहे.
त्यांनी ह्या तालुक्यात स्वतःच्या
समाजा सोबत ईतर समाजालाही सोबत घेत
प्रत्येक समाजात एकोपा व सलोखा कायम
ठेवला आहे. आजही तालुक्यात साऱ्या जाती
धर्म संघटित होऊन कार्य करीत आहे.
आपणही येथे पदासाठी राजकारण न करता
जेष्ठत्वाचे भान ठेवून. आण्णा
साहेबांचा जातीय सलोख्याच्या विचारांचा
अपमान होणार नाही. याचे भान राखून ही
निवड बिनविरोध करावी अशी नम्र विनंती
केली. आपण आज समाजातील जेष्ठ म्हणून व
प्रत्येक कार्यात जातीने हजर राहणाऱ्या
अग्रभागी असणाऱ्या श्री. कन्हैयालाल
लोहार यांना अध्यक्ष म्हणून एक मताने
बिनविरोध निवडावे असे मत व्यक्त केले.
त्यात जेष्ठत्वाचा मान राखला जाईल व
स्व.आण्णा साहेबांच्या विचारांचाही
सन्मान होईल. तरी, आपण विचार करुन
निर्णय घ्यावा असे सांगितले.
मात्र,
लोणखेडा येथील श्री. मोहनभाई लोहार
यांनी म्हसवाद येथील अध्यक्ष श्री.
ज्ञानेश्वर लोहार यांना अध्यक्ष करा
म्हणून उमेदवारी जाहीर केली.
काही
वेळ चर्चे नंतर लोणखेडा येथील श्री.
मोहनभाई लोहार यांनी नवीन शक्कल लढवली.
व सर्व उपस्थितांना सांगितले की,
तालुक्यातील मंडळाचे अध्यक्ष आम्हीं
बाहेर कोपऱ्यात जातो. व आम्ही ठरवतो
.अध्यक्ष कोणाला करावयाचे. त्यात
काहींनी लगेचच हरकत घेत सांगितले की,
तुम्हीं अध्यक्ष बिनविरोध करण्या ऐवजी
अध्यक्ष पदाच्या विरोधात उमेदवार
देतात. त्यात उमेदवार म्हसवाद येथील
अध्यक्षच व प्रकाशा येथील अध्यक्ष मग
राहतात फक्त शहादयाचे अध्यक्ष. हे काय
राजकारण आहे... भो ...? अध्यक्ष निवड
समितीत त्यांना उभा करणारा त्याच
समितीत.? वा भाई..! मग कोपऱ्यात काय
होणार. हे सांगायची गरज काय...!
ह्या अश्या राजकीय खेळी नजरेस पडताच.
सार्यांनी श्री.मोहनभाई लोहार यांचा
कसून विरोध करत, यांच्या ह्या बाहेरील
सुजावास हाणून पाडले. त्यावेळी ह्या
विचारांचा सर्व समाज बांधवांनी विरोध
करीत रोषव्यक्त केला. जर असा जेष्टाचां
अपमान करुन उमेदवार देत, बिनविरोध
होणाऱ्या निवडीला फाटा देत, बाहेर
जाऊन अध्यक्ष निवडायचा होता. मग,
आम्हाला का बोलावले..? असा खडसावुन
अनेकांनी सवाल केला. त्यात ही शक्कल
लढवणाऱ्यांची चांगलीच फसगत झाली.
हा
सारा लाजीर्वाना प्रकार बघणारे सभेचे
मा.अध्यक्ष, जेष्ठ , विचारवंत व मा.
कन्हैयालाल लोहार काहीकाळ सुन्न झाले
होते. तर काही मोठ्यांची मर्यादा
पयदळीस तुडवत सुटत होते. मा. अध्यक्ष,
शहराध्यक्ष, जेष्ठ मंडळी, निःस्वार्थी
समाज बांधव हे सारे अनेकांना शांत
रहा-शांत रहा, मर्यादा पाळा ,आपण
कोणाच्या कर्मभूमीवर बैठक घेत आहोत,
आपण भगवान विश्वकर्मा मंदिरात आहोत,
असे पदासाठी राजकारण करु नका हो....!
अश्या एक -ना-अनेक विनंत्याच्या आवाज
परिसरात घुमत होता. सभेतील अनेक
उपस्थित जाणकार स्पष्ट बोलत होते की,
आत्ता येथे राजकारण घुसले, कोणीतरी
बाहेरील वाईट विचारा च्या व्यक्तीने
हा प्रकार घडून आणण्यासाठी नियोजनबद्ध
पद्धतेने कार्य केले आहे. हे
उमेदवारीचे राजकारण पदासाठीच आहे.हे
स्पष्ट झाले होते.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या तेथे
अनेक उपस्थितांनी दबक्या आवाजात
नामोल्लेख सुद्धा केल्याची चर्चा होती.
हे सारे राजकारण बाहेरील व्यक्तीने
शिजविलेले असल्याचेही अनेक उपस्थित
चर्चा करीत होते. आम्ही अनेकांनी त्या
साऱ्यांमध्ये त्याचे नाव शोधण्याचा
प्रयत्न केला. मात्र, ते कळून आले नाही.
दबक्या आवाजात त्याचा उल्लेख सुरू
असल्याचे तेथे बोलले जात होते.
पुन्हां मा.अध्यक्ष व उपस्थित
मंडळींच्या विनंतीने सर्वांना शांतता
प्रस्थापित करण्यासाठी सांगण्यात आले.
शहादा शहराचे अध्यक्ष
श्री.राजेंद्रभाई लोहार म्हणाले की,
समाजात वावरताना आपल्यातील सर्वजण
ज्याच्या-त्याच्या घरी सुखी आहेत.आपण
एकत्र आलो हा आपला परिवार आहे. पदा
साठी एक-दुसऱ्याचा विरोध कृपया करू नका.
आपण कुठे बसलो आहोत. याचे थोडे भान
ठेवा. आपण श्री विश्वकर्मा भगवान
मंदिरात त्यांच्या सानिध्यात आहोत.
एवढे तरी लक्षात ठेवा. मला आज खंत
वाटते की, समाजात वैचारिक गरिबी वाढत
चालली आहे. समाजात प्रामाणिक कार्य
करीत असलेल्यानी आत्ता समाजात प्रबोधन
करण्याची गरज आहे. पद ही वेवस्था आहे.
कर्म करतांना पदाची आवश्यकता नसते.
आपण समाजातील जेष्ठांचा मान मर्यादा
ठेवा. आपण समाजाचे देणं लागतो. समाज
मोठा असतो माणूस नाही. शांततेत एकमताने
विचार करा. मा.कन्हैयाभाई जेष्ठ आहेत.
हाही विचार करा. मात्र काही कार्य
करीत असतांना आपण हे सारे विसरतो. हे
होऊ देऊ नका. अशी त्यांनी ह्या साऱ्या
प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
पुन्हां एक नवीन विषय मांडण्यात आला
त्यात ५ वर्षे कार्यकाळ असलेल्या
तालुका मंडळात आपण दोघांना संधी
उपलब्ध करुन देऊ त्यात अडीच वर्षे
कार्यकाळ ठेऊ त्यात पहिली संधी मा.
ज्ञानेश्वर लोहार यांना देऊ व नंतर
श्री.कन्हैयालालभाई यांना देऊ. असे
वैयक्तिक जाहीर केल्या वर उपस्थित
अनेकांनी ह्या विषयावर पुन्हां हरकत
घेतली. त्यात,श्री. कन्हैयालालभाई
जेष्ठ आहेत त्यांना कामाचा चांगला
अनुभव आहे.ते प्रत्येक कार्यात सामील
असतात, त्यांना समाज कार्याचा अनुभव
आहे, नवीन मंडळ स्थापन करावयाचे आहे,
सुरवातीचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने
पार पडला पाहिजे. व ते समाजातील तिन्ही
मंडळाशी जुळले आहेत. म्हणून त्यांच्या
जेष्ठत्वचा विचार करुन त्यांनाच
अध्यक्ष करावे असा अनेकांचा सूर आला.
मात्र, मा.ज्ञानेश्वर लोहार यांनी
हट्ट धरला की, मलाच अध्यक्ष करा.
त्यात त्यांच्या बरोबरीने मा. मोहनभाई
लोहार यांनीही तोच हट्ट कायम ठेवला.
मात्र,
श्री.कन्हैयालालभाई यांनी आत्ता
पर्यंत चुप्पी साधून ठेवली होती.
त्यात, त्यांनी सारा प्रकारचा अभ्यास
त्या वेळी केला असावा. व त्यांनीच
तालुक्यातील साऱ्या समाज बांधवांना
एकत्र बोलाविले होते. कदाचित त्यांना
हे कळले असावे. की, मी ह्या साऱ्या
बांधवांना बोलविले. व माझ्या नावाचा
उपयोग करीत. हे मुद्दाम विरोध करीत
असल्याचे त्यांना दिसून आल्यावर
त्यांनी आपले मौन तोडत अनेकांना खडे
बोल सुनावले. त्यात अनेकांची भंभेरी
उडाली. अनेकांनी त्यांना समजावले की,
हेसारे राजकारण आहे भाई. तुम्हीं
आम्हाला बोलावले चांगल्या समाज कार्य
साठी मात्र, येथे काहींनी आपल्या
तालुक्यातील मंडळ निवडीला राजकीय वळण
देऊन टाकले. भाई तुम्हीं भोळे आहेत.
हा सगळा प्रकार वाईट आहे. असे अनेकांनी
त्यांना सांगितले.
व तोच
वरिल प्रकार पुन्हां सुरु झाला. हा
सारा प्रकार पाहून आयोजक पार सुन्न
झाले होते. उपस्थित समाज बांधव ह्या
दोनचार लोकांचा हा कळवळा पाहून मनस्वी
विचारला लागले होते. कोपर्या-कोपऱ्यात
हे शडियंत्र रचणाऱ्या - करनाऱ्याची
चर्चा करीत उभे होते. ह्या सुरु
असलेल्या पदा साठीची उठाठेव धडपड
आमच्या सह सारेच अवाक होऊन थक्क पणे
पाहत होतो. काही आम्हीं मांडलेल्या
सूचना सरळ पायदळी दिल्या जात
होत्या.सदर प्रकार अतिशय अनेकांच्यामते
वाईटच होता. अनेकजण हातवारे करीत
नाकोत्या विषयाची चर्चा करीत आप-आपल्या
बुद्दीचे प्रमाण देत होते. त्यात
त्यांची थोडी कीव ही येत होती. व खंत
वाटत होती.
त्यात स्व.आण्णांच्या समाज, जातीय
सलोख्याचे एकोपाचा पार अपमान
त्यांच्याच गावातील रहिवाशी असलेल्या
आपल्या समाजाच्या एका पदाधिकार्याने
केला होता. त्यांना विंनंती केली होती
ही एकोप्याची, सलोख्याची,समाज संघटीत
ठेवणाऱ्या मा.स्व.आण्णांची कर्म भूमी
आहे येथे पदा साठी राजकारण होऊ देऊ नका.
त्यात मा.अध्यक्ष यांनी सभा
बरखास्थ करण्याचे आदेश देत सभा
बरखास्त केली. मा. अध्यक्षांनी हा
घडलेला सारा प्रकार लाजीर्वाना
असल्याचे व ह्या चांगल्या समाज
कार्याची वाट लावण्याचे राजकारण होत
असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी
तालुकाध्यक्षनी संगीतलेकी नवीन
होणाऱ्या तालुका मंडळाच्या अध्यक्ष
पदाचा हट्ट धरणाऱ्या मा. ज्ञानेश्वर
लोहार यांनी मागील बंद केलेल्या
मंडळात एकही महिन्याची मासिक वर्गणी
दिलेली नाही. अनेकदा मागून सुद्धा
त्यांनी कधीही एक रुपयाही मंडळाला दिला
नाही. जो माणूस मंडळाला मासिक वर्गणी
एवढ्या वर्षात कधीही भरु शकला नाही.
त्यांनी प्रामाणिक समाज कार्य
करणाऱ्यांचा विरोध फक्त पदा साठी करावा.
हे कितपत योग्य आहे. याचे उत्तर ह्या
घडलेल्या प्रकारा मागील समाजात
राजकारण करणाऱ्यानी व माझ्या समाज
बांधवांनी द्यावे.
अशी
खंत त्यांनी व्यक्त करीत साऱ्यांनाच
प्रश्न उपस्थित केला आहे.
आपल्या
समाजात असे स्थिती कुठेही पदा साठी
निर्माण होऊ नये. ह्या साऱ्या घटनेची
समाजातून निंदा करण्यात येत आहे.
कुठल्याही परिस्थितीत साऱ्या संकटातून
मार्ग निघू शकतो. तर ह्या तालुका
अध्यक्ष पदासाठी मार्ग निश्चितच
निघेल.ह्या साठी पुन्हां प्रयत्न होणे
गरजेचे आहे. अन्यथा समाजात मोठे दरी
निर्माण होणार हे नक्की
जय विश्वकर्मा...
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( शहादा
- बातमीदार )
श्री रूपेश
अंबालाल जाधव
मोबाईल - ९४२१४५२१४४ |