|
द्वारा दि.१६\०७\२०१७
रोजी कल्याण या ठिकाणी सन्मान सोहळा ,
वेबसाइट उद्घाटन , ज्येष्टाचा
सन्मान व विद्यार्थ्याचा गुण गौरव व
शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम भव्य समाज
बंधु भगिनीच्या
उपस्थितीत व खालील मान्यवरांच्या
मार्गदर्शनाखाली आनंदमय वातावरणात
संपन्न झाला।
►
प्रमुख अतिथि
◄
श्री दिलीपजी वसव (पुणे)
(कार्यक्रमाचे अघ्यक्ष),
श्री गोपालभाई कुकावलकर(ठाणे),
श्री हरिभाऊ जवने सर(अंबरनाथ),
श्री कुमारभाऊ थोरात(पुणे),
श्री महेशजी वसव (सातारा),
श्री विठ्ठलजी चव्हाण (पुणे),
श्री नागेशजी लोहार (वसई),
श्री प्रदीपभाई लोहार (नाशिक),
(अघ्यक्ष नाशिक मंडळ),
श्री दिनेश पवार (पुणे),
(अघ्यक्ष पुणे मंडळ ),
लक्ष्मीकांत पोपळे (नेरुल),
श्री राजेंद्रजी निळे (कल्याण)।
►
कार्यक्रम खालील
प्रमाणे
◄
१)
प्रथम भगवान
विश्वकर्माच्या प्रतिमेचे पुजन व
द्विप प्रज्वलन करण्यात आले.
२)
शहीद सैनिक व समाजातील
दिवंगतांना श्रधांजली अर्पण
करण्यात आली.
३)
प्रमुख अतिथीचा सन्मान
चिन्ह व कल्याण मंडळाचे नावाची शाल
देवुन सत्कार करण्यात
आले.
४)
gadiloharsamajkalyan.com या नावाची वेबसाइटचे उद्घाटन
करुण समाजास अर्पण
करण्यात आली.
►
या वेबसाइटचे समाजास
होणारा फायदा ...
१)
संपूर्ण जगात आता
कुठे ही व केव्हा ही आपल्या मोबाइल ,
कम्प्यूटर , लॉपटापवर सहज सामाजिक
घडामोडी पाहु शकतात.
२)
समाजाला आता हजारो
लाखो रूपये वधु - वर परिचय पुस्तिका व
खानेसुमारीसाठी गोळा करणाऱ्याना
देण्याची गरज नाही
कारण या वेबसाइटवर आपणास वधु वराची
माहिती उपलब्ध
होईल ते पण एक रुपया खर्च न
करता.
३)
ऑन लाइन न्यूज़
पेपरच्या आधारावर समाजातील बातम्या व
फोटोज आपणास आपल्या
मोबाईल वर सहज वाचता व बघता
येवु शकते.
४)
समाजाची माहिती , मंडळाचा जमा
खर्च अशा अनेक गोष्टी या वेबसाइटवर
उपलब्ध असतील.
प्रमुख अतिथीचे मनोगते झाली ज्यात
अखिल लोहार गाडीलोहार विकास संस्था (महाराष्ट्र
राज्य) चे संस्थापक कार्यवाह श्री
दिलीप वसव व अघ्यक्ष श्री कुमारभाऊ
थोरात यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या...
१)
यापुढे अखिल लोहार
गाडीलोहार विकास संस्था (महाराष्ट्र
राज्य) गाडी लोहार समाज उन्नती मंडळ
कल्याण व अखिल भारतीय श्री विश्वकर्मा
प्रबोधिनी मिळून समाजाच्या विविध
मागण्यांसाठी शासन दरबारी संघर्ष करू.
२)
उपवर मुला -
मुलींच्या लग्नाची मोठी समस्या आहे व
ती निवारण्यासाठी आम्ही या पुढे
कल्याण मंडळाशी निगळीत राहून रोटी -
बेटी व्यवहार करण्याची घोषणा केली व
त्या घोषणेला कल्याण मंडळाचे
पदाधिकारिणी स्वीकार करुण एकमेकांच्या
हातात हात देवुन कार्य सुरु करण्याचे
निश्चित केला.
►
दहा ज्येष्ठ समाज
बंधुना ...
ज्येष्ठ समाज सेवक
पुरस्कार त्यांच्या परिवारा सहित
देण्यात आले ते सन्मानार्थी खालील
प्रमाणे ...
१) श्री
मगन मयाराम कु-हेकर
२) श्री
छनलाल धोंडु
निळे
३) श्री
रघुनाथ रामचंद्र जाधव
४) श्री
अरुण भावलाल गोहिल
५) श्री
सुभाष शिवराम राठोड़
६) श्री
प्रताप गजानन सुर्यवंशी
७) श्री
विठ्ठल राजाराम निळे
८) श्री
ईश्वरलाल केशव राठोड़
९) श्री
गिरेंद्र रामदास लोहार
१०) श्री
रमेश मांगीलाल मकवान
इयत्ता १० वीत प्रथम विद्यार्थिना
१)
कु. वैभवी विजय
लोहार
२)
कु.दिव्या अरुण
निळे
इयत्ता १२ वीत प्रथम
विद्यार्थिना
१)
कु. मानसी भटेश
लोहार
यांना
खालील मान्यवरांन कडून बक्षिस देण्यात
आले...
१)
कै. निंबालाल नागोलाल जाधव
यांच्या स्मरणार्थ श्री
राजेन्द्र निंबालाल जाधव यांच्या कडून
सन्मान चिन्ह इ.१० वीसाठी १००० रु व
इ.१२ वीसाठी ११०० रु रोख बक्षिस.
२)
कै.मनलाल नारायण लोहार यांच्या
स्मरणार्थ श्री छनलाल धोंडु निळे
यांच्या कडून सन्मान चिन्ह व रु. ५०१
/५०१ रोख बक्षिस.
३)
कै.ताराचंद विठ्ठल चव्हाण व
कै . मीराबाई ताराचंद चव्हाण* यांच्या
स्मरणार्थ श्री विजय ताराचंद चव्हाण
सर यांच्या कडून ५०१/५०१ रोख बक्षिस.
४)
श्री प्रदिप ढोमण पवार सर (सानपाड़ा)
यांच्या कडून ५०१/५०१ रोख बक्षिस
देवुन गौरव करण्यात आले.
पदवी व पद्वित्तर
विद्यार्थ्याचा सन्मान पत्र देवुन
सन्मान करण्यात आले.
इयत्ता Sr K.G. ते ११ वी पास
७० विद्यार्थ्यांना वह्या वितरण
करण्यात आले .
शेवटी आभार प्रदर्शन झाले व राष्ट्रगीताने
कार्यक्रमाचा समापन झाले व ५०० पेक्षा
जास्त उपस्थित समाज बंधु , बघिणी व
विद्यार्थ्यांनी सुरुचि जेवणाचा स्वाद
घेवुन कार्यक्रम खुपच सुंदर व यशस्वी
झाल्याचे शब्द् सुमन देवुन निवास
स्थान सुखरूप रवाना झाले...!!!
या कर्यक्रमाल यशस्वी करण्यासाठी
खरी मेहनत मंडळाचे सचिव श्री
राजेन्द्र निंबालाल जाधव व खजिंनदार
श्री सुकलाल मयाराम कु-हेकर व सर्व
कार्यकरणी पदाधिकारी यांनी केली
म्हणुन अघ्यक्षानी यांनी आभार मानले.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण बातमीदार)
श्री
युवराज मुरार जाधव
मोबाईल - ९८६९३४८८६४
|