:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक \१०\२०१७

शिरपुर तालुका गाडी लोहार समाज बहुउद्देशीय मंडळाचा सन्मान सोहळा कार्यक्रम बहुसंख्य समाज बंधु भगिणीच्या उपस्थित आनंदमय वातावरणात संपन्न .

     मा . भूपेशभाई यांनी समाजाला एका महिन्याच्या आत समाज भवनासाठी जागा . व मा.आ. श्री काशीरामजी पावरा यांच्या आमदार निधीतून समाज भवन बांधण्यासाठी दहा लाख रूपये निधि देण्याची घोषणा .

     शिरपुर तालुका श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज बहुउद्देशीय मंडळ , शिरपुर जि. धुळेचा गुण गौरव व सन्मान सोहळा कार्यक्रम दि. १५\१०\२०१७ रोजी सकाळी १० वाजता श्रीमती हेमंतबेन पटेल कार्यालय शिरपुर येथे भव्य समाज बंधु , भगिनी , युवा व विद्यार्थ्याच्या उपस्थितीत व खालील मान्यवराच्या अनमोल मार्गदर्शनाखाली आनंदमय वातावरणात संपन्न झाला .

प्रमुख मान्यवर

मा.आ.श्री काशिरामजी पावरा

(आमदार शिरपुर विधानसभा)

 

मा. ना. श्री भुपेशभाई पटेल

(उपनगराघ्यक्ष - शिरपुर न . पा .)

 

मा. श्री प्रभाकरराव चव्हाण

(मा. नगराघ्यक्ष -शिरपुर न . पा .)

 

मा. श्री सुरेशजी नाना बागुल

(मा. उपनगराघ्यक्ष - शिरपुर न . पा .)

 

मा.श्री देवेंद्रजी राजपुत

(नगरसेवक शिरपुर न.पा.)

 

मा .श्री विजयजी बाफना

(अघ्यक्ष -स्वाभिमान प्रतिष्ठान संस्था )

 

समाज रत्न डॉ.प्रा.श्री अनिल लोहार सर

(सीनेट उ.म.वि. व समन्वयक प्रबोधिनी संस्था )

 

श्री युवराज मुरार जाधव

(अघ्यक्ष - कल्याण मंडळ व कार्याघ्यक्ष - प्रबोधिनी संस्था )

 

श्री रोहिदासजी लोहार आन्ना

(ज्येष्ठ समाज सेवक धुळे)

 

श्री पापालाल पवार सर  , नाना

( अघ्यक्ष - धुळे मंडळ )

 

श्री भिकारी पवार सर

(आदर्श शिक्षक राष्ट्रपति पुरस्कार सन्मानीत)

 

श्री ईश्वर चुनिलाल लोहार

(खांदेश कलारत्न सन्मानीत तबला वाजक)

 

श्री जितेंद्रजी परमार

(खजिंनदार -प्रबोधिनी संस्था )

 

श्री जितेंद्रजी चव्हाण

(अघ्यक्ष -प्रबोधिनी युवा मंडळ)

 

श्री रूपेशजी जाधव

(प्रसिद्धि प्रमुख - प्रबोधिनी संस्था)

 

श्री ताराचंद मुरार जाधव

(कार्याघ्यक्ष - शिरपुर तालुका मंडळ)

कार्यक्रमाचे लक्षणीय क्षण

  1. सर्व प्रथम प्रमुख अतिथीच्या हस्ते द्विप प्रज्वलन व भगवान श्री विश्वकर्मा प्रभुच्या प्रतिमेस मालार्पण करण्यात आले

  2. प्रमुख अतिथिचा सत्कार तालुका मंडळाच्या पदाधिकारी कडून व विशेष सत्कार ज्यात प्राचार्य श्री अनिल लोहार सर , श्री युवराज जाधव , श्री रोहिदास आन्ना , श्री ईश्वर लोहार , श्री पापालाल नाना यांचा मा.भुपेशभाई व प्रमुख अतिथि कडून सत्कार करण्यात आला .

  3. शिरपुर तालुका व अन्य परिसरातील समाजातील विद्यार्थ्याचा गौरव , ट्रॉफी व रोख बक्षिस तसेच ड्रेस व शालेय साहित्याचे वाटप करुण करण्यात आले .

  4. समाजातील गरजु माता भगिनीना दिवाळी सणाचे औचित्य साधुन साड्याचे वाटप करण्यात आले

प्रमुख पाहुण्याचे मनोगत व अनमोल मदत जाहिर

मा .श्री भूपेशभाई..

यांनी शिरपुर तालुका मंडळास एका महिन्याच्या आत समाज भवनासाठी जागा देण्याची घोषणा केली .व संपूर्ण लोहार समाज हा माझा परिवार आहे आणि या परिवारात मी लहानाचा मोठा झालो हे विसरु शकत नाही असे ह्र्दयास स्पर्श करणारे मनोगत व्यक्त केले .

मा .आ. श्री काशीरामजी पावरा

यांनी आपल्या आमदार निधीतून समाज भवन बांधण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधि देण्याचे जाहिर केले , व लोहार समाज हां प्रत्येक वेळेस आमच्या पाठीशी उभे राहून शिरपुर तालुक्याच्या विकासाठी सदैव तत्पर असतो .

डॉ. प्राचार्य श्री अनिल लोहार सर

यांनी आपल्या मनोगतात समाज हित व प्रगती ही काळाची गरज आहे आणि ते होण्यासाठी  संघटन होने गरजेचे आहे आणि आजच्या कार्यक्रमात दिसुन येत आहे .

श्री युवराज मुरार जाधव

यांनी आपल्या मनोगतात म्हटले की , जे बारा वर्षात झाले नाही असे समाजात प्रगतीचे वारे दोन वर्षा पासून खुपच वेगाने वाहत आहेत त्या मागचे मुख्य कारण अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था व तिचे कार्यकर्ते व् संपूर्ण लोहार समाज आहे . गरजुना स्कॉलरशिप , सायकल , नारी शक्तिचा व जेष्ठाचा सन्मान असे अनेक उपक्रमातुन समाज प्रबोधन होत आहे , हे ऐकून मा .श्री भूपेशभाई यांनी सुद्धा शाबासकी दिली .

शेवटी आभार प्रदर्शन झाले व सर्व उपस्थितांनी अल्पहारचा स्वाद घेत कार्यक्रम खुपच सुंदर , समाज हिताचा झाला अशी शाबासकी देत आप आपल्या घरी मार्गाक्रम झाले . कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी ... शिरपुर तालुका श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज बहुउद्देशीय मंडळ , शिरपुरचे सर्व पदाधिकारी यांनी रात्र , दिवस मेहनत घेतली व कार्यक्रम नियोजन समिति यांनी सुद्धा अथक परिश्रम घेतले व शिरपुर नगरित आज पर्यन्त झाला नाही असा समाज हिताचा कार्यक्रम यशस्वी करुण दाखविला ...!!! त्या बद्दल सर्वाचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण या पवित्र कार्यक्रमाचा मी एक साक्षीदार आहे आणि माझी लेखनी मला लिहन्या पासुन रोखु शकली नाही , परत भेटुया असाच एक समाज हिताचा कार्यक्रम राबवून तो पर्यत्न ...!!!

जय विश्वकर्मा.....!!!!

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

मोबाईल ९८६९३५८८६४

दिप प्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार होतांना

विद्यार्थ्याचा गौरव / स्कॉलरशिप / शालेय साहित्य / स्कुल ड्रेस वाटप करतांना .

गरजु माता भगिनीना साड्याचे वाटप होतांना

प्रमुख अतिथीचे ह्र्दयास स्पर्श करणारे मनोगते ज्यात

श्री युवराज मुरार जाधव

मा. श्री भुपेशभाई पटेल

मा.आ.श्री कांशीरामजी पावरा

ड्रॉ.प्राचार्य श्री अनिल लोहार सर

श्री दिनेशभाई लोहार

मा.हसमुखभाई लोहार

कु. प्रेरणा युवराज जाधव

व एका चिमुकलीचे सुद्धा मनोगत झाले .

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216