:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक :१५ ऑगस्ट २०१७

अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था द्वारे एक ऐतिहासिक सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन व संपूर्ण लोहार समाजाला आग्रहाचे निमंत्रण

अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था द्वारा साला बाद प्रमाणे लागातार तिसऱ्यांनदा सन्मान सोहळा कार्यक्रम दिनांक २४\०९\२०१७ रोजी सकाळी ०९ :३० वाजता वेदांत मंगल कार्यालय , नकाणे रोड , देवपुर धुळे या ठिकाणी प्रमुख अतिथी.

मा. ना.ड्रॉ. श्री सुभाषजी भामरे

(केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भारत सरकार) 

मा.ना.श्री जयकुमारजी रावल

(रोजगार व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य)

मा. खा.ड्रॉ.हिनाताई गावित

(संसदरत्न , खासदार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ)

मा.खा.श्रीमती रक्षाताई खडसे

(खासदार रावेर लोकसभा मतदारसंघ)

मा.आ.श्री शिरीषदादा चौधरी

(आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ)

मा.सौ.कल्पनाताई महाले

(महापौर महानगरपालिका धुळे)

मा.श्री रोहिदास गोविंदा लोहार

(ज्येष्ठ सल्लागार गाडीलोहार समाज)

मा.श्री दिलीपजी वसव

(संस्थापक अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य)

       यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजाच्या भव्य उपस्थितीत नियोजन बद्ध साजरी होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र , गुजराथ व मध्यप्रदेश या तीन राज्यातुन लोहार समाज एकत्र येणार आहे व या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट असे की नारी शक्तिचा सन्मान होणार आहे तसेच अन्य समाजहिताचे कार्यक्रम सुद्धा होणार आहेत ज्यात ...

कर्तुत्ववान महिलांचा सन्मान .

ज्येष्ठ समाज सेवकांचा सन्मान .

क्रीड़ा, शैक्षणिक व विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाज बंधुचा सन्मान.

गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप .

इयत्ता १० वी व १२ वीत विशेष गुण मिळविणाऱ्या गरजु विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयाची स्कॉलरशिप वाटप .

       अशा पवित्र व समाज हिताच्या कार्यक्रमास सर्व समाज बंधुना सह परिवार कर जोडून आमंत्रित अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीचे मुख्य समन्वयक ...

मा.ड्रॉ.प्राचार्य श्री अनिल लोहार सर

प्रबोधिनीचे कार्याघ्यक्ष... 

श्री युवराज मुरार जाधव

व सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते तर्फे करण्यात आले आहे . व समाजाची उपस्थिती प्रार्थनीय आहे .

       तसेच कार्यक्रम पत्रिका सर्व समाज बंधुच्या घरा पर्यन्त पोहचविण्यासाठी प्रबोधिनीचे कार्यकर्ते अथक प्रयत्नशील आहेत , पण काही कारणवश पत्रिका नाही मिळाली तर खालील पत्रिका आपणास पाठवीत आहे तरी मोठे ह्रदय करुण समाज कार्यासाठी जरूर उपस्थितीत राहावे ही विनंती अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्थाच्या कार्यकर्ता कडून करण्यात आली आहे .

सुरवात सोडु नका शेवट टाळु नका

         जय विश्वकर्मा.....!!!!!

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

मोबाईल ९८६९३५८८६४

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216