:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
  दिनांक १०/०३/२०१८ 

समाजातील ऐतिहासिक कार्य​ ​कल्याण मंडळ अंतर्गत राज्यस्तरीय​ ​लोहारसमाज आरोग्य समिति गठित​

  मोफत सेवा...   मोफत सेवा...!!!​  

​सुख जवा समान, दुःख पर्वता एवढे

       या वाक्या प्रमाणे समाज बंधुनो आपले जीवन आहे , जीवन म्हटले तर सुख आणि दु:ख अशा वलयात फिरणारे काल चक्र आहे . पण आयुष्यात सुख हे क्षणिक तर दुःख सदैव असते , त्यात आजारपण हे सर्वात मोठे दुःख आहे दुष्काळात तेरावा महीना असे तेव्हा म्हटले जाते ज्या वेळेस परिवारातील कमवता व्यक्ति जर मोठ्या आजार पणाने ग्रसित झाले तेव्हा , पाया खालची माती सरकते व डोळ्या समोर अंधार उभे राहते . त्यात जर ड्रॉक्टरांनी सांगितले की पेशंन्टला मुबंई , पुणे , नागपुरला न्या त्यावेळेस त्या परिवाराची तारांबळ उड़ते .. हालत खराब होते . कारण वेळेवर पैसे नाही , मुबंई , पुणे , नागपुर सारख्या ठिकाणी कसे जावे - कसे राहावे असे अनेक संकटे उभी राहतात .

       समाज बंधुनो अशा संकटाना आता मुळीच घाबरू नका कारण 

​गाडी लोहार समाज उन्नती मंडळ कल्याण​ ने दि १०\०३\२०१८ रोजी मिटींग घेवुन एक ऐतिहासिक समाज हिताच्या कार्यास मंजूरी देत प्रत्येक्षात कृतीत आणत आहोत . लोहार समाजातील मुंबई , पुणे , नागपुर व परिसरातील MD / MBBS / सर्जन व लैब स्पेशालिस्ट तसेच मेडिशियन विभागातील  तज्ञ व स्पेशालिस्ट ड्रॉक्टराचे एक ​राज्यस्तरीय लोहार समाज आरोग्य समिति​ स्थापन करण्यात आली आहे . जे लोहार समाजातील ऐतिहासिक बाब आहे . ही तज्ञ ड्रॉक्टरांची समिति व त्यांच्या साथीला कल्याणकर समाज पेंशन्टचा योग्य उपचार फ्री मधे करण्यास मदत करणार आहे . व  शासन दरबारी अथवा अन्य ट्रस्ट द्वारे पैशाची मदत सुद्धा उपलब्ध करण्यास विशेष मदत करणार आहे . 

  समितीचे महत्वपूर्ण कार्य  ​

​१) लोहार समाजातील कुठल्याही परिवारातील सदस्य आजारी असेल त्यांच्या आजार सबंधी डिटेल 9869358864 या वाट्सएप नंबरवर  किंवा विविध ठिकाणच्या मंडळ अघ्यक्ष किंवा कल्याण मंडळाचे कार्यकारणी पदाधिकारी यांच्या कडे पाठवावी  .​

​२) आपण पाठवलेली डिटेल काही मिनिटांनी लगेच लोहार समाज आरोग्य समिति या वाट्सएप ग्रुपवर ..ज्यात फक्त ड्रॉक्टर , लैब स्पेशालिस्ट व मेडिसिन विभाग तज्ञ आहेत  यात टाकण्यात येईल व त्यावर काही मिनिटांनी अभ्यास करुण त्यावर योग्य तो मार्ग व  दिशा निर्देश व सहकार्य करतील .​ 

​४) महत्वाचे मुबंई सारख्या ठिकाणी ड्रॉ. प्रशांतजी मकवाना यांचे मोठ मोठे तब्बल दोन हॉस्पिटल आहेत व ड्रॉ. हर्षदजी लोहार हे सरकारी हॉस्पिटलचे इंचार्ज आहेतच पण के .ई.एम. / जे.जे. / सायन व प्रायव्हेट हॉस्पिटलशी घनिष्ट संबध आहेत व त्यामुळे आजारपनावर योग्य पेशन्टचा उपचार होईल .​

​५) ड्रॉ. श्री योगेशजी लोहार यांच्या कार्याबाबत सांगायचे म्हटले तर क्रिटिकल पेशंटवर उपचार व बाहेरील देशाचे रिपोर्ट्स त्यांच्या कडे चेकिंगसाठी येतात म्हणुन असे महान तज्ञाचे लाख मोलाचे आपणास मिळणार आहे .​

) श्री आर .टी. लोहार हे मेडिशिन विभागाशी सलंग्न असल्या कारणाने योग्य ती औषधीची मदत होईल व श्री घनश्याम लोहार हे लैब स्पेशालिस्ट असल्या कारणाने चेकअपसाठी विशेष मदत होईल .​

​लोहार समाज आरोग्य समिति​ 

ड्रॉ .श्री हर्षदजी लोहार​

      (MBBS / MD - सर्जन नवीमुंबई)

ड्रॉ .श्री योगेश सुरेश लोहार(पुणे)​

      (MBBS / DMRD / DMD - पुणे)

ड्रॉ .श्री प्रशांतजी मकवाना​

      ( MD -  कल्याण)

ड्रॉ. श्री योगेशजी जावणे (लोहार)​

      ( MD - फिजिशियन नागपुर)

ड्रॉ .श्री हरेश सुरेश लोहार(पुणे)​

      (MAMS / MD / आयुर्वेदिक)

ड्रॉ .कु. स्वप्नाली जयंतभाई लोहार​

      (MBBS / MD - नवीमुबंई)

ड्रॉ . चि. स्वप्निल जयंतभाई लोहार​

      ( BDS . - नवीमुंबई)

ड्रॉ .कु. मृणाली राजेश लोहार​

      (BAMS - मुबंई)  

श्री आर .टी . लोहार (मुबंई)​

      (प्रशासकीय अधिकारी केमिष्ट अँड  आं ड्रगिष्ट विभाग - महाराष्ट्रा राज्य)

श्री घनश्याम लोहार ( पुणे )​

      (BSC / PG DMLT - PUNE)
जय विश्वकर्मा ...!!!


•═════• 🔮 •═════•

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

मोबाईल ९८६९३५८८६४


▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

 
 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216